Lok Sabha Election 2024 : बारामतीत सर्वात मोठा ट्विस्ट, सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं घडतंय काय?


Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच परिवारातील दोन सदस्यांमध्ये लढत होत आहे.

अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वात मोठा ट्विस्ट बारामतीत पाहायला मिळाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या.

अजित पवार आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत, त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. Lok Sabha Election 2024

सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. त्यावेळी घरात अजित पवार होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेणे आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या.

दरम्यान, बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या.

सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता त्या अजितदादांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतरच या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!