Lok Sabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला उमेदवारही ठरला, सुप्रिया सुळेंनी केली मोठी घोषणा…


Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये १९५ उमेदवारांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या सहा आणि सात तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे.

जागा वाटप होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपण बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांमध्ये बारामतीत काय काय विकास कामं झाली? याचा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन देखील केलं आहे. Lok Sabha Election 2024

तर, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दोनच दिवसांपूर्वी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बारामतीच्या खासादर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा उमेदवारीबाबत घोषणा करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!