Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! लोकसभेचे बिगुल वाजलं, १९ एप्रिलपासून लोकसभेसाठी मतदान, ४ जूनला निकाल…
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुका होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच ४ जूनला सर्व देशात मतमोजणी होईल.
या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदारांची आकडेवारी देखील दिली आहे. त्यानुसार १.८२ कोटी पहिल्यांदाचा मतदान करणार आहेत. १८ ते २९ वयोगटातील २१.५० कोटी मतदार आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ वयापेक्षा अधिक आहेत.
मतदानाच्या काळात सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरल्या जातात. त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता जर कोणतीही सोशल मीडियावरील पोस्ट ही आक्षेपार्ह असेल किंवा त्यामुळे निवडणुकंचं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, त्या पोस्ट काढून टाकण्याचे अधिकार आम्ही राज्य सरकारला दिले आहेत. Lok Sabha Election 2024
काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशाचा गैरवापर होतो. तसेच फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीच्या बळाचा आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे कुठेही हिंसा झाल्यास अजिबात दया दाखवली जाणार नाही, असं म्हणत राजीव कुमार यांनी उमेदवारांना देखील इशारा दिला आहे.