Lok Sabha Election 2024 : मी निवडून आले तर गाव तिथे बार, महिला उमेदवाराच्या झिंगाट आश्वासनाची राज्यात चर्चा…


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून मतदारांवर अक्षरशः आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे.

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूक २०२४ चा प्रचार सुरु झाला आहे. या प्रचारादरम्यान एका महिला उमेदवाराने विचित्र आश्वासन दिले आहे, त्याची देशभरात चर्चा आहे.

मी निवडणूक जिंकली, तर कमी दरात लोकांना व्हिसकी आणि बिअर उपलब्ध करुन देईन, असं वनिता राऊत या उमेदवाराने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्या अखिल भारतीय मानवता पार्टीच्या सदस्य आहेत. वनिता राऊत अशा पद्धतीचा प्रचार करुन मद्यपानाला प्रोत्साहनच देण्याबरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळवतायत. Lok Sabha Election 2024

“मी लोकसभेला निवडून आली, तर प्रत्येक गावात फक्त बिअर बार उघडणार, सोबत खासदार निधीतून परदेशी दारु आणि बिअर उपलब्ध करुन देईन” अस वनिता राऊत यांनी म्हंटले आहे. ‘जिथे गाव, तिथे बिअर बार’ असा प्रचार सध्या वनिता राऊत करत आहेत.

रेशनिंगच्या माध्यमातून परदेशी दारु उपलब्ध करुन देईन. त्यासाठी पिणाऱ्यांना आणि विक्रेत्यांकडे परवाना आवश्यक असेल. वनिता राऊत आपल्या मुद्याचा समर्थन करताना सांगतात की, “खूप गरीब लोकांना दारु पिण्यामध्ये समाधान मिळत. पण त्यांचा उंची दारु, बिअर परवडत नाही.

त्यांना देशी दारुवर समाधान मानाव लागत. मला त्यांना परदेशी दारुचा आनंद द्यायचा आहे. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!