Lok Sabha Election 2024 : दिल्ली दरबारी आजच होणार महाफैसला!! महायुतीची अमित शहा यांच्यासोबत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार..


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुका होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.

यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. अशातच आता राजकीय पक्षांच्या बैठकांना देखील जास्त वेग आला आहे.

अशातच आता महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्वाची माहिती समोर येत असून, आज दिल्लीत महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अमित शाह स्वतः उपस्थित असणार असून, याच बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. Lok Sabha Election 2024

बैठकीला राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार असून, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील जाण्याची शक्यता आहे. आहे

दरम्यान, अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक होणार असून, यात जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटक पक्षांच्या जागा वाटपाबद्दल आज महायुतीमध्ये अंतिम चर्चा होऊन जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ७ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!