Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीला पहिलाच मोठा धक्का! ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक आरोप करत दिला स्वबळाचा नारा….


Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने लोकसभा निवडणूक लढवू. आम्ही दिलेले सर्व प्रस्ताव फाडून टाकले. माझा प्रस्ताव मान्य झाला नाही, त्यामुळे आता आम्ही एकटेच निवडणूक लढवू.” त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधींची सभा होती, आम्ही इंडिया आघाडीत असूनही आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही. Lok Sabha Election 2024

ममतांच्या घोषणेवर भाजप नेते गौरव भाटिया यांनी टोमणा मारत म्हटले की, ‘म्हैस पाण्यात गेली आहे. अहंकार की झांडिया?” तर भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले की, हे लोक पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या अहंकारी युतीमध्ये सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे.

दरम्यान, टीएमसी बंगालमध्ये कोणाशीही युती करणार नाही. बंगालमधील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत त्यांच्या पक्षाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

तसेच, काँग्रेसनं त्यांच्याशी याबाबत काहीही चर्चा केली नाही. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीत काही प्रस्ताव दिले, तेसुद्धा फेटाळले गेले आहेत. तसेच, काँग्रेसचा पश्चिम बंगालशी काहीही संबंध नाही, असं म्हणत ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!