Lok Sabha Election 2024 : सर्व स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार! शरद पवार यांची तरुणांसाठी मोठी घोषणा….


Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणूक साठी शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. जाहिरनामा प्रकाशित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

या जाहीरनाम्यात समाजाचे विविध प्रश्न समोर ठेवून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे.

जाहिरनामा प्रकाशित करताना जयंत पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वयंपाक गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत.

तसेच पेट्रोल-डिझेलचे दर मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणार असे पाटील यांनी आश्वासन दिलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आले आहे.

शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी प्रयत्न करणार. शासकीय नोकरीमध्ये महिलांचे आरक्षण ५०% ठेवण्याचा प्रयत्न करणार शिवाय अप्रेंटिसशिप करताना सक्तीचं स्टायपेंड देण्याचं कायदा करणार आणि स्पर्धा परीक्षांसाठी आकारण्यात येणार परीक्षा शुल्क बंद करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली.

तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेणार. शेती करण्याच्या नवनवीन पद्धती आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार. जातीय जनगणना करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण करणार. खाजगी शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार. Lok Sabha Election 2024,

तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची निर्मिती करणार असून आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी अर्थसंकल्पामध्ये चार टक्के अतिरिक्त निधी देण्याचा प्रयत्न करणार. शिवाय शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद सहा टक्क्याने वाढवणार असल्याची घोषणादेखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आली.

शेतीमालावरील जीएसटी एसटी रद्द करणार. वन नेशन वन इलेक्शन , चीनकडून करण्यात येणारे घुसकरी याबाबत पक्षाचे खासदार संसदेत आवाज उठवणार. सक्षम न्यायव्यवस्था करण्यासाठी आवश्यक बजेट पुरवणार.

कामगारांचे वेतन हे चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याबाबत सरकारमध्ये आल्यास नियोजन करणार. सरकार आल्यास कंत्राटी भरती रद्द करण्यात येणार .गरिबांसाठी रेशन कार्डाच्या मर्यादित सुधारणा करणार. अशी माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!