Lok Sabha Election 2024 : अवघडच झालं! काँग्रेसने उमेदवारी दिली पण अचानक राजीनामा देऊन उमेदवाराने हाती घेतल कमळ, नेमकं काय घडलं?
Lok Sabha Election 2024 : गुजरातनंतर इंदुरमध्येही काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. इंदुर लोकसभेतील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. निवडणुकीतून माघार घेतलेल्या बम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ही माहिती दिली आहे.
कैलास विजयवर्गीय यांनी काँग्रेस उमेदवारासोबतची सेल्फी शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. विजयवर्गीय सोशल मीडियावर लिहितात, काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या भाजपात स्वागत आहे. Lok Sabha Election 2024
इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान…
इंदूर लोकसभेच्या जागेसाठी २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २९ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसला कोणताही मागमूस लावण्यापूर्वी विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. ४ जूनला निकाल जाहीर होईल.
दरम्यान, गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. निलेश कुम्भानी यांचा अर्ज सुरतमध्ये बाद ठरवण्यात आला होता. त्यामुळे भाजपला एकहाती यश मिळाले आहे.