Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये ना भाजप ना शिवसेना, छगन भुजबळांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब..

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे.
नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे. Lok Sabha Election 2024

महायुतीतील दोन महत्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली. तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमदेवारीसाठी शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणाच केली होती. मात्र त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी वादावादी झाली होती.