Lok Sabha Election 2024 : दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन, अजित पवारांसह राहुल कुल राहणार उपस्थित….

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी दौंड तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी माहिती दिली आहे.
यावेळी माहिती देताना तालुकाध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या दि. 25 रोजी दुपारी तीन वाजता चौफुला (ता.दौंड) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार , दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आव्हानही तालुकाध्यक्ष ठोंबरे यांनी केले आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याठिकाणी घरातच लढत असल्याने राज्याचे लक्ष याकडे लागले असून कोण विजयी होणार हे लवकरच समजेल.