Lok Sabha Election 2024 : बारामतीत मनसेमध्ये गद्दारी!! राज ठाकरेंचा आदेशही झुगारला, नेमकं घडलं काय?


Lok Sabha Election 2024 : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला मोदींना पाठिंबा जाहीर केला. सध्या अजित पवार महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे बारामतीमध्ये मनसेचा पाठिंबा अजित पवारांना आहे.

मनसैनिक राज्यभरात महायुतीच्या प्रचारात सहभागी झाल्याच दिसत आहे. असे असताना बारामती लोकसभा मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी हा आदेश पाळला नाही. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचा आरोप दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केला आहे.

यामुळे आता याची चर्चा बारामतीत सुरू आहे. याबाबत त्यांनी तसे पत्रक जाहीर केले आहे. संतोष दसवडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आमदार रोहित पवारांबरोबर असलेला फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावरूनच दसवडकर यांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला असल्याचा आरोप गारुडकर यांनी केला आहे. Lok Sabha Election 2024

दरम्यान, राज साहेब ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भविष्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज‌साहेबांचा आदेश झुगारुन मनसे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवड‌कर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया ताईंना पाठींबा दिला आहे.

तसेच राजसाहेबांचा आदेश डावलून अशा प्रकारची गद्दारी पक्ष सहन करणार नाही. संबंधितांवर हकालपट्टीची त्वरित कारवाई होणार हे निश्चित आहे, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!