Lok Sabha Election : अनेक जागांवर धक्कातंत्र! ठाकरे गटाचे १७ शिलेदार ठरले, उमेवारांची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या…
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .
अशातच आता ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता.
त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. Lok Sabha Election
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, अशी पोस्ट करत राऊतांनी याविषयी माहिती दिली. ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपांचा तिढा मिटला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
उमेदवारांची यादी खालील प्रमाणे…
बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
दक्षिण मध्य – अनिल देसाई