Lok Sabha : मोठी बातमी! संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून २ तरुणांच्या उड्या, रंगीत धूर सोडला अन्..


Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज बुधवारी (ता.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी तिथून खाली उडी मारली. त्यानंतर ते एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते. एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता.

त्यानं स्प्रे मारल्यानंतर सदनात पिवळा धूर पसरला. खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले.

प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणारा तरुण लातुरचा असून त्याचे नाव अमोल शिंदे असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. Lok Sabha

लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे. हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २२ व्‍या स्‍मृतिदिनीच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्‍याचा दावा विराेधी पक्षाचे सदस्‍य करत आहेत

संसदेत लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी स्मोक कँडल कशासाठी नेले होते. तर सुरक्षा रक्षकांकडून इतकी मोठी चूक कशी काय झाली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांच्याकडून काहीतरी फेकले गेले ज्यातून वायू बाहेर पडत होता.

त्यांना खासदारांनी पकडले, त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज आम्ही २००१ मध्ये (संसदेवर हल्ला) बलिदान दिलेल्या लोकांची पुण्यतिथी साजरी केली. यानंतर झालेला हा प्रकार हा नक्कीच सुरक्षेचा भंग आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!