CAA : मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीपूर्वीच सीएए कायदा लागू करण्यासाठी हालचालींना वेग…


CAA : लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याआधी केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणी गृहपाठ पूर्ण केला आहे. सीएएचे नियम जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नियमांनुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या भारताच्या तीन शेजारी देशांतील मुस्लिम समुदाय सोडून सर्व स्थलांतरितांसाठी भारतीय नागरिकत्व मिळवणे सोपे होणार आहे. CAA

या सहा समुदायांमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी यांचा समावेश आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक ११ डिसेंबर २०१९ रोजी संसदेने मंजूर केले आहे. या विधेयकाला अवघ्या एका दिवसानंतर राष्ट्रपतींची संमती मिळाली.

सीएएमुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ अंतर्गत हा नियम सुलभ करण्यात आला असून नागरिकत्व मिळविण्याचा कालावधी १ ते ६ वर्षे करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!