कर्ज, LPG, UPI, शेअर मार्केट, कारच्या किमती; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक बदल, जाणून घ्या होईल खिशावर परिणाम…


सध्या नवीन वर्ष सुरू झाले आहे. यामुळे आपल्या दैनंदिन अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना आरबीआयकडून हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अलीकडेच आरबीआयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे आता त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, 1 जानेवारी 2025 रोजी, तेल विपणन कंपन्या स्वयंपाकघर आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती सुधारतील आणि नवीन दर जाहीर करतील.

असा देखील नियम करण्यात आला आहे. तसेच फीचर फोनवरून ऑनलाइन पेमेंट सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI 123Pay लाँच केले आहे. त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जी 1 जानेवारी 2025 पासून लागू केली जाऊ शकते.

यामध्ये वापरकर्ते आता 10,000 रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करू शकतील, पूर्वी जे फक्त 5,000 रुपये होते. तसेच 1 जानेवारी 2025 पासून अनेक कंपन्यांच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा यासह अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 2 ते 4 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.

तसेच सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सच्या मासिक एक्स्पायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी होणार आहे. हा देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!