अंबानी कुटूंबात आली छोटीशी लक्ष्मी, मुकेश अंबानी झाले आजोबा…

मुंबई : श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना जगात ओळखले जाते. त्यांच्याबाबत सतत चर्चा होत असतात. असे असताना आता त्यांच्या घरात एक आनंदाची बातमी आली आहे. मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत.
श्लोका अंबानी आणि आकाश अंबानी यांनी नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आकाश आणि श्लोका यांना याआधी पृथ्वी हा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
यामध्ये श्लोका अंबानीचा बेबी बंप दिसत होता. यानंतर ती आई होणार असल्याची बातमी चर्चेत आली होती. आता त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.
दरम्यान, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे मार्च २०१९ मध्ये लग्न झाले होते. खरंतर श्लोका आणि आकाश हे बालपणीचे मित्र आहेत. २०२० मध्ये श्लोकाने एका मुलाला जन्म दिला होता.