पॅन-आधार लिंक नसेल तर,पॅनकार्ड निष्क्रिय…!


नवी दिल्ली : तुम्ही अजूनही तुमचा पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबरशी लिंक केला नसेल, तर हे काम पाच दिवसात पूर्ण करा. दर महिन्याच्या १ तारखेला नवीन आर्थिक नियम लागू होतात. त्याचा परिणाम एप्रिलच्या १ तारखेला जाणवणार आहे. आता मार्च महिना संपत आला आहे. यासोबत यंदाचे आर्थिक वर्षही संपणार आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. काही नियमात बदल होणार असून वाहने आणि इतर गोष्टींचे दर वाढणार आहेत. याशिवाय पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर पॅनकार्ड निष्क्रिय होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत तुम्ही दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय केले जाणार आहे. यानंतर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला ते आधारशी लिंक करताना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. भारत स्टेज-२ च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी अशा अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. सर्व कंपन्यांनी त्यांचे नवीन दर १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते वेगवेगळ््या कंपन्यांच्या कारची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच डिमॅट खातेधारकांनी १ एप्रिल २०२३ पूर्वी नॉमिनीचे नामांकन करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खातेधारकांचे खाते गोठवले जाणार आहे. सेबीच्या परिपत्रकानुसार डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे.

दिव्यांगजनांसाठी यूडीआयडी अनिवार्य
दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ आता १ एप्रिलपासून दिव्यांगांना युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे यूडीआयडी नाही, त्यांना त्यांच्या यूडीआयडी नोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतरच १७ सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सिलिंडरच्या दरात बदल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या गॅस आणि सीएनजीच्या दरात बदल करतात. अशा स्थितीत व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार की घट होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

६ अंकी हॉलमार्क नसेल तर सोन्याची विक्री नाही
१ एप्रिल २०२३ पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ एप्रिलपासून ज्वेलर्स ६ अंकी हॉलमार्क क्रमांक नोंदणीकृत असलेल्या सोन्याची विक्री करू शकणार आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने १८ जानेवारी २०२३ रोजी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी हॉलमार्क ऐच्छिक होता.

जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर भरावा लागेल
५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावर ताण येऊ शकतो. सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती की १ एप्रिल २०२३ पासून वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणा-या उत्पन्नावर कर भरावा लागणार असल्याचे म्हटले होते. यातून युलिप योजनेला वगळण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!