LIC ची जबरदस्त योजना! एकदाच गुंतवणूक केल्याने वर्षाला 1 लाख रुपयांची पेन्शन मिळणार, काय आहे योजना?


पुणे : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीतील योजनेत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना चांगलाचं परतावा मिळत असतो. अशातच आता एलआयसीची नवी पॉलिसी आली आहे.एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीत गुंतवणूक केल्याने वर्षाला १ लाख रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.एलआयसीच्या जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीनंतर १ लाखांची पेन्शन मिळते. एलआयसी जीवन शांती हा सिंगल प्रिमियम प्लान आहे.एलआयसीच्या या पॉलिसीत ३० ते ७९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत कोणताही रिस्क कव्हर नाहीये. परंतु या योजनेत अनेक फायदे मिळतात. एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसाठी दोन ऑप्शन मिळतात. एक म्हणजे डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा म्हणजे अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ.एलआयसीच्या न्यू जीवन शांती स्किममध्ये तुम्ही पेन्शनची लिमिट ठरवू शकतात

तसेच या योजनेत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते. जर कोणताही ५५ वर्षीय व्यक्ती ११ लाख रुपये जमा करत असेल आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल तर तुम्हाला वर्षाला १,०१,८८० रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला ८,१४९ रुपये मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!