मोठी बातमी! बोगस खतं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द! धनंजय मुंडे यांनी दिला दणका..

पुणे : राज्यामध्ये बोगस खते आणि बियाणं विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतं. कित्येकदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीही हातचे जाते.

बोगस खते आणि बि-बियाणांमुळे बळीराजाचे मोठे नुकसान होऊन दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे खर्च देखील जास्त होतो आणि बळीराजाला याचा मोठा फटका देखील बसतो.

बोगस खतांच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बोगस बि-बियाणांसाठी एक नंबर दिला आहे. ज्यावर आपण कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो.

धनंजय मुंडे यांचे ट्वीट
बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही.
या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे, ही विनंती. असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खते आणि बियाणांच्या कंपन्यांवर नवीन कायदा आणणार असल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर आता कृषिमंत्री धनंजय मुंडे ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
