इंदापूरमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला


इंदापूर : तालुक्यातील पळसदेव नजीक मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर 1 व काळेवाडी नंबर 2 याच्या दरम्यान सोलापूर पुणे लेनवर घडली आहे.

जरी बिबट्या ठार झाला असला तरी इंदापूर तालुक्यात बिबट्याच्या झालेल्या शिरकावाने उजनीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट दिसून आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्या ठार झाल्याचे समजताच इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी यांसह महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस हवालदार भानुदास जगदाळे, पोलीस नाईक नितीन वाघ यांनी अपघात स्थळी भेट दिली.

दरम्यान, मृत बिबट्याचा पंचनामा केला असून मृत बिबट्याचे शव वन विभागाने पुढील तजविज कामी ताब्यात घेतले आहे. वनविभागाने यापूर्वी अन्नाच्या शोधात एक बिबट्या येऊन गेल्याच्या विषयावर दुजोरा दिला होता. मात्र काही झाले तरी इंदापूरच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!