मोठी बातमी ! मंगलदास बांदल यांना रात्री उशीरा ईडीकडून अटक !
शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. तब्बल 16 तास चौकशी केल्यानंतर ईडीनं बांदल यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यात राजकारणात मोठे नाव असलेल्या मंगलदास
बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाड येथील निवासस्थानांवर छापे टाकले होते. तब्बल
सोळा तास ईडीचे पथक झाडाझडती घेत होते. यावेळी राज्य राखीव पोलिस दलातील पोलिसांचा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. बांदल यांना यापूर्वी
शिवाजीराव भोसले बँकेच्या कर्जप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ते जामीनावर बाहेर होते.
मंगळवार( दि.२१ ) याच प्रकरणात बांदल यांच्या मनी लॉर्डींग प्रकरणी ईडीचे पथक बांदल यांच्या तपासासाठी दाखल झाले होते. या तपासात निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रूपयांची रक्कम, पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळे आढळून आली. यानंतर बुधवारी पहाटे सोळा तासांच्या चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे.
दरम्यान मंगलदास बांदल पुणे जिल्ह्याच्या राजकारणात
एक बडे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भेटीने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यांनी लोकसभेला महायुतीचा प्रचार केला होता. या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचे बडे नेते टार्गेट केले होते.