पुण्यात रिंग रोडच्या कामात हलगर्जीपणा? डंपरची घरावर पलटी, दोन महिलांचा जागीच मृत्यू..


पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोडच्या कामादरम्यान भरधाव डंपर घरावर पलटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिंग रोडच्या कामादरम्यान भरावाच्या कामात गुंतलेला डंपर चालकाचा ताबा सुटून एका घरावर पलटला.
या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. तसेच प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत आणि योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान पोलीस या प्रकरणाची अधिकृत चौकशी करत असून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थरातून होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!