हलगर्जीपणा आला अंगलट! बिपरजॉय वादळाच्या अलर्टनंतरही जुहू बीचवर मुलं पोहायला गेली, दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू..
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे सध्या समुद्रकिनारी अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी कोणी जाऊ नका असे सांगण्यात आले आहे. असे असताना मुंबईच्या जुहू बीचवर पोहायला गेलेली सहा मुलं समुद्रात बुडाली. सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात आलं आहे. तर उर्वरित चारपैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध सुरु आहे.
धर्मेश भुजियाव (वय 15 वर्षे), जय ताजभरिया (वय 16 वर्षे), भाई मनीष (वय 15 वर्षे) आणि शुभम भोगनिया (वय 16 वर्षे) अशी समुद्रात उतरलेल्या मुलांची नावे आहेत.
काल संध्याकाळी आठ मुलांचा एक ग्रुप जुहू बीचवर आला होता. चक्रीवादळाच्या अलर्टनंतरीही मुलं समुद्रात गेले. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
परंतु यानंतरही या मुलांनी वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि समुद्रात उतरले. लाईफगार्ड्सनी त्यांना समुद्रात न जाण्यास सांगितलं होतं. गार्डने शिटीही वाजवली होती, पण तरीही सहा मुलं आत गेली.
आठ जणांपैकी दोघांनी पाण्यात जाण्यास नकार दिला. तर उर्वरित सहा जण समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील जोरदार लाटांमुळे सर्व 6 जण बुडू लागले, त्यापैकी दोन जणांना लाईफगार्ड्सनी वाचवलं, मात्र चार मुलं खोल समुद्रात बुडाले.
सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात आलं आहे. तर उर्वरित चारपैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध सुरु आहे.