लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार! अटॅकनंतरही नराधमांचे धक्कादायक कृत्य, घटनेने सगळेच हादरले…

नवी दिल्ली : दक्षिण कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे.
एक विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. अत्याचारादरम्यान पीडितेला पॅनिक अटॅक आला, मात्र नराधमांनी इनहेलर देऊन तिला बरे करून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील आरोपींनी रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, या संतापजनक घटनेची नोंद २५ जून रोजी रात्री ७.३० ते १०.३० च्या दरम्यान झाली. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने दोन साथीदारांसह या तरुणीला लॉ कॉलेजच्या कॅम्पस परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या खोलीत नेलं आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
तक्रारीनुसार, पीडितेला आधीच काही अनहोनीची कल्पना झाली होती आणि त्यामुळेच तिला पॅनिक अटॅक आला. मात्र आरोपींनी इनहेलर आणून तिला दिला, आणि ती सावरताच तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले.
अत्याचाराच्या वेळेस, मुख्य आरोपी तरुणीवर बलात्कार करत असताना इतर दोन आरोपींनी त्याचा व्हिडीओ फोनमध्ये रेकॉर्ड केला. हे प्रकार केवळ अमानवी नसून, मानवतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडणारे असल्याचं स्पष्ट होतं.
पीडितेने प्रसंगावधान राखून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, कोलकाता पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. POCSO कायदा व भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,या घटनेनंतर, शिक्षणसंस्थांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कोलकात्यातील महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी समाजमाध्यमांवरून जोर धरत आहे.