देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासा ‘एवढ्या’ कोटींना विकण्यास मंजुरी…

पुणे : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासा डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विकण्यास मान्यता दिली आहे.
NCLTच्या ऑर्डरमध्ये सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला डार्विन क्रेडिटर्सनी रिझोल्यूशन प्लॅनच्या बाजूने मतदान केल्यानंतर मान्यता देण्यात आली आहे.
लवासाच्या कर्जदारांनी या विक्रीच्या ठरावाच्या बाजूनं मतदान केल्यानंतर एनटीसीएलटीने डार्विन कंपनीच्या या ठरावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार येत्या आठ वर्षांत डार्विन कंपनी १८१४ कोटी रुपये या सगळयासाठी खर्च करणार आहे.
यात 929 कोटी रुपये कर्जदारांना देण्यात येणार आहेत. तर लवासात घर खरेदी केलेल्यांना पूर्ण विकसित घरे देण्यासाठी ४३८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, न्यायाधिकरणाने दिलेल्या पंचवीस पानाच्या आदेशात म्हटले आहे की, १,८१४ कोटींच्या गुंतवणुकीच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदेशात म्हटले आहे की, या रकमेमध्ये १,४६६.५० कोटी रुपयांच्या रिझोल्यूशन प्लॅन रकमेचा समावेश आहे, ज्यामधून कॉर्पोरेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम दिली जाईल.