लॉरेन्स बिश्नोई गँगकडुन संजय राऊतांना धमकी! ‘मुसेवाला टाइप करुन टाकेन’..!


मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमकीनंतर राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेज करून ‘मी तुझाही मुसेवाला करून टाकेन’, असं म्हटलं आहे. मेसेजमध्ये राऊत यांना हिंदूविरोधी म्हणत शिवीगाळही करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल रात्री एका संशयिताला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने मिळालेल्या या धमकीमध्ये म्हटले आहे की, ‘जर तुम्ही दिल्लीत सापडलात, तर तुम्हाला एके 47 ने उडवले जाईल, मूसेवाला करून टाकू.’ या धमकीनंतर राऊत यांनी पत्र लिहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!