दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज हिचा राजकारणात प्रवेश…!

दिल्ली : माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांची दिल्ली भाजपच्या कायदेशीर कक्षाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांसुरी स्वराज या सुषमा स्वराज यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी इनर टेंपलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. त्या वडील स्वराज कौशल यांच्याप्रमाणे फौजदारी वकील (क्रिमिनल लॉयर) आहेत.
बांसुरी पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात त्यावेळेस आल्या, जेव्हा त्या आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या कायदेशीर टीमचा भाग असल्याचे उघड झाले. ज्यानंतर बांसुरी वादात सापडल्या. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी आपल्या मुलीच्या बचावात म्हटलं होतं की, ती तिच्या व्यवसायासाठी मोकळी आहे आणि ती तिच्या कामासाठी मोकळी आहे.