लेट पण थेट! माॅन्सून ३ जुलैपासून संपूर्ण राज्य मुसळधार कोसळणार…

पुणे : राज्यात सर्वांचे लक्ष हे सध्या पावसाकडे लागले आहेत. यामुळे तो कधी पडणार याची चर्चा सुरू आहे. यंदा मान्सून बराच लांबला आहे. आता देशात सर्वत्र पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. याबाबत आता हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिलेली आहे.

महाराष्ट्रात महिनाभर लांबलेला माॅन्सून ३ जुलै पासून संपूर्ण राज्य व्यापून मुसळधार पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशात बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका आहे. ते जखाऊ बंदरावर धडकल्याने वाऱ्याचा वेग ताशी १५० किमीपर्यंत पोहोचू शकतो. कच्छ आणि सौराष्ट्रच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये काहींचे जीव देखील गेले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 33 तुकड्या गुजरात आणि महाराष्ट्रात तैनात आहेत. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा काही भाग, अंतर्गत तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्य बिहारमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
१६ आणि १७ जून रोजी नैऋत्य राजस्थानमध्ये आणि १७ रोजी अग्नेय राजस्थानमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत देशाच्या इतर भागात विशेष हवामानाचा अंदाज नाही. पावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत.