कांद्याला 350 रुपये अनुदान मिळण्यासाठी आज शेवटचा दिवस; कृषी बाजार समित्यांत करावा अर्ज…!

मुंबई : राज्यात शेतकरी कांद्याच्या भावाने चिंतातूर झाला आहे. भाव नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. कुठे कांदा फेकून देऊन शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहेत. या सर्व परिस्थितीवर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फक्त आजचाच दिवस बाकी आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा शेतकरी आणत आहेत.
दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे –
शेतकऱ्याने कांदा विकलेली पावती
सातबारा उतारा
बचत खाते पासबुक
हे सर्व कागदपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार आहे