महाबळेश्वरमध्ये रस्त्यावर दरड कोसळली! रस्ता तब्बल 10 फूट खचला, वाहतूक ठप्प..


महाबळेश्वर : राज्यात सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाता पावसाचा जोर ओसरला, तरी संततधार कायम आहे.  गेल्या तीन दिवसांपासून डोंगरी भागामध्ये मोठा पाऊस सुरू आहे. रस्ता खचल्याने महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पर्यटक अडकले आहेत.

येथील तापोळा महाबळेश्वर रस्ता गेल्या काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. आता मात्र तोच रस्ता खचला आहे. सध्या कोयना धरणात 9 हजार क्युसेक वेगाने पाणी येत असून धरणातील पाणीसाठा 26 टीएमसीकडे वाटचाल करत आहे. जून महिन्याच्या मध्यापासूनच सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर सुरु आहे.

याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. यावर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने वातावरण चांगले झाले आहे. यामुळे पर्यटकांची देखील गर्दी वाढता आहे. यामुळे अनेक अपघातांच्या घटनेतदेखील वाढ होत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयनागनर, नवजा येथे पावसाची संततधार होती.

बुधवारी सकाळी आठपर्यंत 24 तासांत कोयनानगर येथे 79 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे 94 आणि महाबळेश्वरला 82 मिलीमीटर पाऊस झाला. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला 467, नवजा 460 आणि महाबळेश्वर येथे 406 मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून डोंगरी भागामध्ये मोठा पाऊस सुरू आहे.

दरम्यान, रस्ता खचल्याने महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रशासन सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी कामाला लागले आहे. सध्या याठिकाणी वाहतूक ठप्प आहे. येणाऱ्या काळात लवकरात लवकर वाहतूक सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!