राष्ट्रवादीचा शिरूर लोकसभेचा उमेदवार ठरला! लांडे यांनी शक्तिप्रदर्शन केले पण पवारांची कोल्हेंना पसंती


शिरूर : गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी याठिकाणी दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिरूरमधून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बारामती तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून, धक्कादायक कारण आले समोर

आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. आज पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील घटनेने राज्यात खळबळ! बापाने मुलीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळले

दरम्यान, विलास लांडे यांनी आपल्या वाढदिवशी मतदारसंघात पोस्टरच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यांनी या जागेवर दावा केला होता. तसेच कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

असे असताना आता शरद पवार यांनी अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आल्यानंतरही ते आपल्या दाव्यावर ठाम आहेत. राष्ट्रवादीची बैठक दरम्यान दुसरीकडे येत्या 9 जून रोजी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे.

हा वर्धापन दिन अहमदनगरला साजरा होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आणि नियोजनासाठी पुणे ग्रामीणची आढावा बैठक बोलावण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!