Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर! ललितच्या दोन मैत्रिणींना अटक; ‘ससून’मधून पळून जाण्यास..


Lalit Patil Drugs Case  पुणे : ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी शिताफीने अटक केल्यानंतर आज पुणे पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर आता पुणे पोलिसदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी बुधवारी रात्री नाशिक येथून दोन महिलांना अटक केली आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची प्राथमिक माहिती सामोर येत आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावं आहेत. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. Lalit Patil Drugs Case

ससूनमधून पळून गेल्यानंतर तो नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामाला होता. नाशिकमध्ये त्याची राहण्याची सोयदेखील या दोघींने केली होती. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याने कमावलेला काळा पैसाही या दोघींकडे ठेवायला दिला होता.

या दोन्ही महिलांना पुणे पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. ललित हा प्रज्ञा आणि अर्चना यांच्या संपर्कात होता, असे पोलिस तपासात आढळले आहे. Lalit Patil Drugs Case

पुण्यातील ससून रूग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्यानंतर थेट नाशिकला गेला. तिथे गेल्यानंतर तो प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन्ही मैत्रिणीला भेटून त्याने कमावलेला काळा पैसा या दोघींकडे ठेवायला दिला.

ललित पाटीलच्या घरात टाकलेल्या छापेमारीत पोलिसांना ३ किलो सोने सापडले होते. पाटीलकडे आणखी पाच किलो सोनं असून या दोघींकडे सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना नेपाळच्या सीमेवरून काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. ललित आणि भूषण दोघांची एकत्रितपणे चौकशी होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!