Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळेबद्दल खळबळजनक माहिती आली समोर, आता सगळा प्लॅन उघड..


Lalit Patil Drugs Case : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे सामील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, लवकरच तिला अटक करण्यात येणार आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. त्यामुळे या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. Lalit Patil Drugs Case

त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) ‘ससून’मधून चालणाऱ्या तस्करी प्रकरणी सोमवारी कांबळेला आरोपी करण्यात आले. यापूर्वी तिच्यावर आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते.

कांबळेदेखील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय होता. ललित पाटीलने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर नाशिकला जाऊन दोघींची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी २५ लाख रुपये हस्तांतर केल्याचे निष्पन्न झाले.

कांबळे हिला ‘एनडीपीएस’अंतर्गत आरोपी करण्यासंदर्भातील माहिती तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. पोलिस कोठडीचा कालावधी राखीव ठेवून दोघींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान , ॲड. कांबळेने याप्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगितले होते. ललितला मदत करण्यास मदत केल्याप्रकरणी ॲड. कांबळे आणि तिची मैत्रीण अर्चना यांना अटक करण्यात आली होती. दोेघींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर जामीनाचा मार्ग मोकळा होईल, असे ॲड. कांबळेला वाटले होते.

मात्र, ललितच्या अमली पदार्थ व्यवसायात ॲड. कांबळे सामील असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तिला अटक करण्याचे हक्क पोलिसांनी राखून ठेवले. त्यानंतर ॲड. कांबळेला न्यायालयात रडू कोसळल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!