Lalit Patil Drugs Case : बडे मासे येणार गोत्यात?, ललित पाटील याचे पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे, ससूनमधील डॉक्टर अन् पोलिसही..

Lalit Patil Drugs Case पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी काल बंगळुरूमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी दिली आहे. पोलिसांनी ललित पाटील याची काल कसून चौकशी केली.

या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललितला कुणा कुणाचा वरदहस्त होता? कोण त्याला मदत करायचं? याची माहिती समोर येणार असल्याची शक्यता असून त्यामुळे अनेक बडे मासे गोत्यात येण्या ची शक्यता वर्तवली जात आहे. Lalit Patil Drugs Case
ललित पाटील याची पोलिसांनी काल कसून चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. ललित पाटील पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. Lalit Patil Drugs Case

ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहिती ललितने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितले आहे.
ललित पाटीलला कुणाचा राजकीय वरदहस्त होता का? त्याला बाहेरून कोण मदत करत होतं याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण होतं? त्याला ससूनमध्ये भेटायला कोण कोण यायचं? त्याच्याकडून कुणा कुणाला हप्ते जायचे? याचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी बुधवारी रात्री नाशिक येथून दोन महिलांना अटक केली आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची प्राथमिक माहिती सामोर येत आहे. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावं आहेत. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.