सोन्याची जेजुरी! भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक जेजुरीत दाखल…
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जेजुरीतील सर्व रोड देखील गच्च भरले होते. यामुळे अनेकांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्या.
भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत करत चार लाखांवर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. रविवारी रात्री १० अमावस्या सुरू झाल्यानंतर आज रात्री १२ वाजेपर्यंत अमावस्येच्या पर्वकाळ असल्याने आज जेजुरीत भर सोमवती यात्रा भरली होती.
सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्या असली की त्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा भरते. दुपारी पेशवे, खोमणे, आणि माळवदकर पाटील या मानकऱ्यांच्या उपस्थितीत खांदेकरी, मानकरी, सेवकांकडून पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला.
मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून बालदारीत देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. या अंतर सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर कूच केले.
सायंकाळी देवाला कऱ्हा नदीवर विधीवत स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर सोहळा माघारीचे प्रस्थान ठेवणार आहे. देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त अड् विश्वास पानसे, पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, देवसंस्थांन चे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.