नव्या वर्षांत पुणेकरांची मेट्रोला पसंती! लाखो नागरिकांनी केला पिंपरी ते स्वारगेट मार्गावर प्रवास..

पुणे : मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्याने अनेक जण त्याला पसंती देत आहेत. त्यामुळे दरदिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.

नववर्षाच्या सुरुवातीच्या सात दिवसांत पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामधून या सात दिवसांत ८५ लाखांवर मेट्रोचे उत्पन्न झाले आहे. स्वारगेटपर्यंत मेट्रो झाल्याने नागरिकांना प्रवास करणे सोपे झाले आहे.

पुणे शहरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. अनेकजण नववर्षाची सुरूवात देवदर्शनाने करतात. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनीही बुधवारी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

तसेच कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय पुण्यात आला होता. प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्याने अनेक जण त्याला पसंती देत आहेत. त्यामुळे दरदिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.
दरम्यान, स्वारगेटपर्यंत मेट्रोची व्यवस्था झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुण्यात कमी वेळेत जाताना अधिक सोयीचे होत आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट Swargate To Pimpri मेट्रो या मार्गावर वर्षाच्या पहिल्याच आठवड्यातील सात दिवसांत पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर या मार्गिकेवर ८४ लाख ९० हजार ४३४ प्रवाशांनी प्रवास केला असल्याची नोंद आहे.
