पुण्यात मॉडेलिंग क्षेत्रात काम देतो म्हणून तरुण तरुणींना लाखोंचा गंडा, धक्कादायक प्रकार आला समोर..
पुणे : पुण्यात मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करून मिळवा पाच ते सात हजार रुपये असे सांगून तरुण युवा युवतींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
या घडलेल्या प्रकाराचा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 23 मुलांकडून 43 लाख 93 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
याबाबत तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. एका तरुणीने सांगितले मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. अनेकांची याबाबत फसवणूक झाली आहे.
दररोज पाच ते सात हजार रुपये देखील मिळतील असे सांगण्यात आले. तक्रारदार श्रद्धा अंबुरे ही त्या कंपनीला भेटायला देखील गेल्या होत्या, त्यानंतर त्यांना पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले.
दरम्यान, युवा युवतींना द पुणे स्टुडिओला बोलवण्यात आले. यावेळी 21 मार्चपासून हे काम सुरू होईल असे युवा युतींना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची कंपनी ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना काम मिळाले नाही, असे सांगण्यात आले.