जॅकी श्रॉफच्या बायकोला ५८ लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण..
मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलांनो सावधान! बनावट नवरीने दीड वर्षात केले वीस मुलांशी लग्न, पुण्यातील मुलांचा समावेश
फर्नांडिस म्हणून ओळखले जाणारे किकबॉक्सिंग असोसिएशन फायटर टायगर श्रॉफच्या MMA मॅट्रिक्स कंपनीमध्ये ऑपरेशन्सचे संचालक म्हणून नियुक्त झाला. त्याच्या खात्यात जमा झालेले पैसे एमएमए मॅट्रिक्स जिम टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा यांचे आहेत आणि दोघेही तिथल्या सर्व हालचाली पाहत होते.
याबाबत फर्नांडिस याची २०१८ मध्ये एमएमए मॅट्रिक्स फर्ममध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. फर्मच्या माध्यमातून भारतात आणि परदेशात ११ स्पर्धा आयोजित केल्याचा आणि त्याच्या वैयक्तिक खात्यात ५८.५३ लाख रुपये जमा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
तुकोबारायांच्या पालखीचे उद्या दोन वाजता पंढरीकडे प्रस्थान
दरम्यान, आरोपी ऍलन फर्नांडिसवर आयपीसी कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चौकशी पोलिस करत आहेत.