पुण्यात ‘लेडी डॉन’च निघाल्या मास्टरमाइंड ; मसाज पार्लरमध्ये तरुणींच्या शरीराचा सौदा, दोघींना ठोकल्या बेड्या..


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात अवैध धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी भागात सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबतचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वेश्याव्यवसाय दुसरं तिसरं कुणी नव्हे, तर दोन महिलांकडून चालवला जात होता. सहकारनगर पोलिसांनी छापेमारी करत मसाज पार्लरच्या दोन महिला चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील एका इमारतीमध्ये ‘हॅपी स्पा मसाज पार्लर’ नावाचं दुकान आहे. या दुकानात मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाईची योजना आखली. या मसाज पार्लरमध्ये तरुणींच्या शरीराचा सौदा केला जात होता. हा व्यवसाय लीना ऊर्फ सोफिया डिसूझा आणि विभा कल्याणकर या दोन महिला चालवत होत्या. पोलिसांनी दोघींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एका इमारतीत अशाप्रकारे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पार्लरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री करून घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकून मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!