लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती…

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.या योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. दरम्यान, यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचा संताप व्यक्त केला आहे. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला होता. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले असल्याची चर्चा होत आहे. आता यावर स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेचे निकष कधीही बदलले नाहीत,निकष तेच आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, निकष कधीही या योजनेचे बदललेले नाहीत. निकष तेच आहेत. डेटा व्हेरीफिकेशन ही सततची प्रकिया आहे. आम्हाला अनेक विभागाकडून डेटा मिळाला आहे.हा डेटा मिळाल्यानंतर आम्ही क्रॉस व्हेरीफिकेशन केलं. एखाद्या आठवड्यात आम्हाला सर्व जिल्ह्यातून एकत्र केलेली माहिती मिळेल. यातून थांबवण्यात आलेल्या महिलांना लाभ मिळेल पात्र महिलांना लाभ मिळेल. जे अपात्र ठरतील त्यांना माहीत होत की ते अपात्र ठरणार. पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही ही आमच्या विभागाची भूमिका आहे, असं त्यांनी स्पष्ट केल आहे.

लाडकी बहीण योजनेत किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, रोज वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. त्यावरही आदिती तटकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.आज लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक आहे.2कोटी 30 लाखांपेक्षा संख्या कमी झालेली नाही, असं त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं त्यांनी स्पष्टीकरण दिले.

