Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता कधी जमा होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती…


Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी ५९ लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये जोरदार चर्चा आहे. १९ सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल, असे सांगण्यात येत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा येथे बोलताना याविषयी महत्वाची माहिती दिली.

या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली. तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले. त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारनामे करत आहे, त्याचा पाढाच वाचला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली. आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले हे फसवी योजना आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे. पण आतापर्यंत १ कोटी ६० लाख खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता दोन कोटीच्यावर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका. आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू. पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च २०२६ पर्यंतचे पैसे ठेवू.

शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात. तशी तरतूद करण्यात येईल. काहीही झालं पुढचे पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला. पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!