लाडकी बहीण योजना अपडेट ; तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ, पैशांची काटेकोर वसुली होणार


पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल १४ हजार पुरूषांनी घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता सरकार ॲक्शन मोडवर आले असून अपात्र लाभार्थ्यांवर निश्चितच कारवाई करून पैशांची वसुली केली जाईल असं स्पष्ट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्ही राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत. या आकडेवारीची स्थानिक पातळीवर काटेकोर छाननी करण्यात येत आहे.चुकीच्या लाभार्थींना लाभ मिळू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सामाजिक न्याय किंवा इतर कोणत्याही विभागाचा निधी वळवून या योजनेला देण्यात आलेला नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुरुषांनी घेतलेल्या लाभाची वसुली देखील केली जाणार असल्याच तटकरे यांनी स्पष्ट केल आहे.

ज्या पुरुषांच्या खात्यावर योजनेतील लाभाचे पैसे जमा झाले त्यांनी हे जाणीवपूर्वक केले की, घरातील महिलेचे बँक खाते नसल्याने त्यांनी त्यांचे खाते दिले हे तपासून पाहण्यात येणार आहे. ज्या सरकारी कर्मचा-यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावरही कारवाई झाली असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!