Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता अर्ज करण्याची मुदत अजून वाढणार…
Ladki Bahin Yojana : जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत.
सध्या ३० सप्टेंबर २०२४ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. ही अंतिम मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंत असू शकते असा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, २४ सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळपास २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले आहे. आणि सप्टेंबर अखेर पर्यंत ही संख्या आणखीनच वाढणार आहे. जर सरकारने ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली, तर ही संख्या 3 कोटींच्या वर देखील जाण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana
आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्या जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच २९ सप्टेंबरला पात्र महिन्याच्या खात्यात तिसरा हप्ता येणार असल्याची माहिती देखील हाती आलेली आहे. आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकर जमा होणार आहे.