Ladki Bahin Yojana : आता ‘या’ महिलांच्या अकाउंटवर येणार थेट ६ हजार, जाणून घ्या महत्वाची माहिती….


Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली. ज्या महिलांनी सुरुवातीलाच फॉर्म भरले होते. त्याच्या अकाउंटमध्ये राखी पोर्णिमेच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी जमा झाला. महिलांना तीन हजार रुपये मिळाले.

दरम्यान, अनेक महिलांना फॉर्म भरुनही पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नव्हता. त्यांना आता तिसऱ्या हप्त्यामध्ये थेट साडे चार हजार अकाउंटमध्ये आले आहेत. २५ सप्टेंबरपासून तिसरा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना हे पैसे आले. Ladki Bahin Yojana

मात्र सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरुनही ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही. त्या महिलांच्या अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात थेट सहा हजार रुपये जमा होणार आहे. यामुळे तुम्ही सप्टेंबरच्या आधी अर्ज केला असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला जुलै पासून ते सप्टेंबरपर्यंत सर्व हप्ते मिळणार आहेत.

दरम्यान, ज्या महिलांनी सप्टेंबर नंतर आपला फॉर्म भरला आहे त्यांना जुलै ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही. त्यांना केवळ सप्टेबरनंतरचे हप्ते मिळणार आहेत. म्हणूनच तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांना फक्त दीड हजार येतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!