Ladki Bahin Yojana : ‘त्या’ मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या नेत्याची मागणी….
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
अशातच आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. Ladki Bahin Yojana
प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील.
मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.