Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस ही फक्त अफवाच?, जाणून घ्या काय आहे सत्य…


Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी २६ लाखांहून अधिक राज्यांतील बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, काही महिलांना या योजनेतून दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

मात्र काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असे यामधून सांगण्यात येत होते. मात्र याबाबत शासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या घरचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे अशा २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पैसे दिले जात होते. अशा महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै महिन्यापासून राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसेही जमा करण्यात आले आहेत. महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. Ladki Bahin Yojana

दरम्यान, लाडक्या बहिणींना २०० रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तरकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवाळीत कोणत्याही प्रकारचा २५०० रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार नाही आहे.

डिसेंबर महिन्यात पैसे खात्यात येणार?

आता थेट डिसेंबर महिन्यात पैसे खात्यात येतील. मात्र अद्याप पैसे कधी खात्यात जमा होतील याची तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, सरकारकडून दिवाळी बोनस म्हणून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याची माहिती पसरली होती. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. मात्र, आता बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!