Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, ‘या’ दिवशी मिळणार २१०० रुपये? जाणून घ्या…

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ २१०० रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे.
महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या या योजनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यातच त्याची रक्कम खात्यात जमा केली होती.
महायुतीने निवडून आल्यानंतर १५०० ऐवजी २१०० रुपये देणार, अशी घोषणा केली होती. आता महिलांना याचे पैसे कधी मिळणार, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. Ladki Bahin Yojana
कुणीही मनात कोणतीच शंका ठेऊ नका. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेबाबत देखील महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याच्या प्रक्रियेसाठी काही दिवस लागू शकतात. आता महिलांना संक्रांतीला डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, लाडक्या बहीणींची संक्रांत गोड होईल.