Ladki Bahin Yojana : फोटो, आधार कार्ड महिलांचं, अर्जावर नाव पुरुषांचं, लाडकी बहीण योजनेत भावांचा धक्कादायक प्रताप…


Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे.

त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. परंतु या योजनेचे लाभ घेण्यासाठी वेगवेगळे फंडे काही जणांकडून वापरण्यात येत आहे. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत.

नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे.

कन्नड तालुक्यातील १२ भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठव्यात आला आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला. Ladki Bahin Yojana

त्या लोकांनी फक्त महिलेचे छात्राचित्र वापरले. हा प्रकार समोर आल्यानंतर १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला. त्या लोकांनी फक्त महिलेचे छात्राचित्र वापरले. हा प्रकार समोर आल्यानंतर १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!