Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…


Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या अर्जदार महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना १४ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट यादरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले गेले आहेत. ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला होता त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले आहेत.

मात्र ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना कधीपर्यंत पैसे मिळणार हा मोठा यक्षप्रश्न उपस्थित केला जात होता. आता याच संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. Ladki Bahin Yojana 2024

लाडकी बहीण योजनेचे १ ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी ३१ ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी १ ऑगस्टपासून या योजनेत ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना पैसे मिळणार आहे.

सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जांची छाननी सुरु आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ४५ ते ५० लाख महिलांना पैसे मिळणार असल्याचे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!