Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहिणींसाठी मोठी बातमी! आता योजनेतील बहिणीचे रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड झाली तर…


Ladki Bahin Yojana 2024 : भारतातील विविध राज्यांची राज्य सरकारे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि महायुतीला पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.

तसेच निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबतचे सूतोवाच केला होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. Ladki Bahin Yojana 2024

दरम्यान, आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला २१०० रुपये लवकरच देण्यात येणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यासह काही महिला निकषात बसत नाहीत, तशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी केली जाईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले होते.

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरच हा लाभ २१०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्यासंबंधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

त्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. मात्र सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे, त्याच अर्जांची छाननी केली जाईल, असे सांगितले जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group